गुहागर उबाठा युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा राजीनामा

पक्षासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण

गुहागर/प्रतिनिधी : उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुहागर तालुका युवासेना अधिकारी इम्रान घारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आमदार भास्कर जाधव यांच्याकडे दिला आहे. पक्षासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण त्यांनी दिले असून कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

युवासेना अधिकारी म्हणून २०२२ पासून इम्रान घारे हे गुहागर तालुक्यात कार्यरत होते. अनेक युवकांचे प्रेरणास्थान होते. आपला व्यवसाय सांभाळून पक्षासाठी गेली कित्येक वर्षे ते काम करत आहेत. युवकांची संघटना मजबूत करुन आ. जाधव यांना राजकीय बळ देण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांनी आपली राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करुन कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे स्पष्ट केले आहे.