खानोलकर वाचन मंदिरची २८ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

सावंतवाडी :
कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर मळगांव या संस्थेची रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २८ जून रोजी सायं. ४:३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात होणार आहे. यावेळी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन. २०२५-२६ वर्षाचा अहवाल व जमाखर्चाला मंजूरी देणे, २०२६-२७ वार्षिक अंदाजपत्रक मान्यता देणे, २०२६-२७ वर्षासाठी हिशेब तपासनीसाची नेमणूक करणे, ग्रंथालयाचा रौप्य महोत्सव साजरा करणे वार्षिक सर्वसाधारण संस्थेची सूचना सभासदांना डिजिटल माध्यमाद्वारे देण्यास मान्यता देणे. आदि विषयावर चर्चा होणार आहे. वाचन मंदिरचे अध्यक्ष महेश खानोलकर कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी सभासदांना उपस्थितीचे आवाहन केले आहे.