दोडामार्ग : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोवा बनावटीची अवैध दारू आणि चारचाकी वाहन असा एकूण 6 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून 2026 रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुनील तुकाराम हिंडगावकर (रा. पाटणे फाटा, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याकडून 1 लाख 68 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू तसेच 5 लाख रुपयांची चारचाकी गाडी असा एकूण 6 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(A)(E) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदानंद राणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल डोमणिक डिसोझा, बस्त्याव डिसोझा आणि जॅक्सन घोणसालविस यांनी संयुक्तरीत्या केली.













