साटेली भेडशीत बंद घर फोडले; ३ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

​दोडामार्ग पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

​दोडामार्ग:
तालुक्यातील साटेली भेडशी वरचीवाडी येथे एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशेशाव सालू रोड्रिक्स (वय ४८, रा. साटेली भेडशी वरचीवाडी, ता. दोडामार्ग) या आपल्या भावाच्या घरी राहत आहेत. दिनांक २८ जून २०२६ रोजी रात्री १०.०० वाजेपासून ते २९ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास हे घर बंद होते. याच संधीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

​चोरीला गेलेल्या ऐवजाचा तपशील:
​सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत रु. ८०,०००/-)
​सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट (किंमत रु. ८०,०००/-)
​सुमारे ११ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ (किंमत रु. ४०,०००/-)
​सुमारे ११ ग्रॅम वजनाची दुसरी सोन्याची माळ (किंमत रु. ४०,०००/-)​सुमारे ३ ग्रॅम वजनाचे कानातील जोड (किंमत रु. १२,०००/-)
​५०० रुपयांच्या १२० नोटा मिळून एकूण ५५,०००/- रुपयांची रोख रक्कम ​असा एकूण ३ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या घटनेची फिर्याद २९ जून रोजी दोडामार्ग पोलीस ठाण्यात देण्यात आली.
​याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(A), ३३१(३)(४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सदरचा गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल धुमाळे यांनी दाखल केला असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भगत करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे साटेली भेडशी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.