गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील मूळ बुरंबाड गावची,व माखजन इंग्लिश स्कूल माखजन आणि ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी ,व पूर्वाश्रमीची निना भिकू किंजळकर व आताची सौ गौरी घनःश्याम घडशी ह्यांची केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झाली आहे.
विभागीय परीक्षेद्वारे समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) म्हणून समुपदेशाने चिपळूण तालुक्यातील कोसबी येथे पदोन्नती मिळाली आहे.
निना यांनी २०११ मध्ये करजुवे शाळा नं ३ मध्ये शिक्षण सेवक म्हणून कामकाजस सुरवात केली.त्यानंतर साडेअकरा वर्षे बुरंबाड नं १ येथे अध्यापन केले.२०२३ मध्ये कोंडीवरे मराठी शाळेत बदली झाली.याचं १५ वर्षांच्या काळात. त्यांनी डी.एस.एम.,बी.ए.आणि एम.ए.इन इज्युकेशन मध्ये पूर्ण केले.
सौ नीना यांची केंद्रप्रमुख म्हणून निवड झाल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा. वर्षाव होत आहे.













