मिसेस महाराष्ट्र २०२६ दिव्या चिपळूणकरची टॉप तीनमध्ये निवड

चिपळूण (प्रतिनिधी) : अलोरे गावची सुकन्या दिव्या देवदास चिपळूणकर हिने मिसेस महाराष्ट्र २०२६ स्पर्धेत सेकंड रनर अप हा मानाचा किताब पटकावला आहे.
आपल्या बालपणापासून अनेक राज्य नृत्यस्पर्धा, मॉडेलिंग यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी दिव्या आपल्या विवाहानंतर तब्बल बारा वर्षे पेण येथील शहा परिवारात कौटुंबिक वातावरणात रमली. कंटेंट क्रिएटर म्हणून तिने पाच वर्षाच्या मुलाकडे लक्ष देत काम पाहिले. नामांकित ब्रँडसाठी सर्जनशील डिजिटल कंटेंट त्यांनी तयार केले. बारा वर्षानंतरही आपले स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबई येथे स्पर्धेत भाग घेतला. स्वप्नाला जिद्दीची साथ असेल तर वय अडथळा असू शकत नाही असा संदेश तिच्या यशाने अधोरेखित झाला आहे. अलोरे पंचक्रोशीतील असंख्य रसिकांनी याबाबत तिचे अभिनंदन केले आहे.