मसुरे | प्रतिनिधी
हडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देऊ रामचंद्र भोजणे ( 77 वर्ष ) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ‘काका’ या टोपण नावाने ते ओळखले जात. हडी जेष्ठ नागरिक सेवा संघांचे ते माजी पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पत्नी, दोन मुलगे, पुतणे, सुना, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोजणे यांचे जेष्ठ बंधू तर आनंद आणि कृष्णकांत भोजणे यांचे वडील होत.













