वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यात भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदार यादी पुनः निरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे. पुढील येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्यामध्ये सहभागी होणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच प्रमाणे तालुक्यात पक्ष वाढीकडेही लक्ष द्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले आहे.
वेंगुर्ले भाजप कार्यालय येथे मंडल मासिक बैठक जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. सदर बैठकीस जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या सोबत प्रदेश सदस्य श्री शरद चव्हाण, भाजपा मंडल अध्यक्ष श्री विष्णू उर्फ पप्पू परब, सरचिटणीस श्री वसंत तांडेल, जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुषमा प्रभुखानोलकर, जि.उपाध्यक्ष महिला मोर्चा वृंदा गवंडळकर, चिटणीस (ST महिला) चेतना रजपूत, उपनगराध्यक्ष श्री सुहास गवंडळकर, जि.प.सदस्य तथा जि. प. शिक्षण आणि आरोग्य सभापती श्री.प्रितेश राऊळ जिल्हा कार्यकारीणी सदस्य श्री.मनवेल फर्नांडिस,श्री. साईप्रसाद नाईक, वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री ज्ञानेश्वर केळजी, नगरसेवक श्री.सचिन शेट्ये, सौ. गौरी माईणकर, श्रीम. गौरी मराठे, सौ. शीतल आंगचेकर, सौ रिया केरकर, सौ काजल कुबल, श्री सदानंद गिरप,श्री.सुधिर पालयेकर, श्री प्रशांत आपटे, श्री.दाजी परब, श्री रविंद्र शिरसाट, महिला शहर अध्यक्ष सौ.श्रेया मयेकर, माजी नगरसेविका सौ.साक्षी पेडणेकर, सौ हसीनाबेगम मकानदार, पंचायत समिती सदस्य श्री संकेत धुरी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री प्रणव वायंगणकर, मच्छिमार सेल अध्यक्ष श्री.दादा केळुसकर, सरपंच श्री.सत्यविजय गावडे, श्री.बंड्या पाटिल, श्री.अवी दुतोंडकर तसेच शक्तीकेंद्र प्रमुख श्री गुरुनाथ मडवळ, श्री सायमन आल्मेडा, श्री.विष्णु कोंडसकर, श्री.सुधिर गावडे, श्री.आनंद मेस्त्री, बुथ प्रमुख श्री.नामदेव सरमळकर, श्री.मारुती दोडशानट्टि, श्री.संतोष सावंत तसेच जिल्हा कार्यकारीणी सदस्य, तालुका कार्यकारीणी सदस्य,शक्तिकेंद्र प्रमुख,बुथ प्रमुख व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.













