वाशिष्ठी शिव नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ
वाहतूक खोळंबली
चिपळूण (प्रतिनिधी):–
चिपळुनात वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली; नगरपरिषदेने सतर्कचा इशारा म्हणून वाजवले भोंगे!

Chiplun Taluka-
Date- 05.07.2026
Report Time- 5:00 PM
१)आज रविवारी Red Alert तर सोमवार व मंगळवार या दोन दिवसांकरीता रत्नागिरी जिल्ह्याला Orange Alert आहे.
२) चिपळूणमधील वशिष्ठी नदीची इशारा पातळी ही ५ मी आहे. आता सायं ६ वा पाणी पातळी ५ः२० मी. आहे. वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. दुपारी ३.२२ वा. ४.१२ मी.ची भरती होती. आता ओहोटी सुरू होईल. आता पाऊसही कमी झालेला आहे. जगबुडी नदीची पाणी पातळी १०.१० मी असल्याने पाणी पातळी कमी होण्यास वेळ लागत आहे. पुढील एक ते दोन तास सतर्क राहणे आवश्यक आहे.
३) ५ ते ६ या कालावधीत कोळकेवाडी परिसरात ३ मीमी पाऊस पडला आहे. तर सकाळी ८ वा ते ५ वाजेपर्यंत १०३ मीमी पाऊस पडलेला आहे. कोळकेवाडी धरणाच्या सर्व मशीन बंद आहेत.
४) इशारा पातळीबाबतचे भोंगे वाजविण्यात आले आहेत. नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये.
५) आकले येथील 11 kv Tivre feeder वरील 5 pole पडले आहेत.
Total Vallige 6 बंद आहेत.
आकले. kadwad. तिवरे. Riktoli. तिवडी. इंदापूर. Total Customer 1100 बंद आहेत.
६) मिरजोळी सहकारवाडीमध्ये ३ इमारतीच्या केबिन पाण्याखाली गेल्याने
11 kv मालदोली विद्युत पुरवठा बंद केलेला आहे.
रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी शिव नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडलाने शहरातील बाजारपूल परिसरात तसेच रंगोबा साबळे रोड, भाजी मंडई परिसरात नदीचे पाणी शिरल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.












