​कुडासे तिठा येथे ५,१०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल

​दोडामार्ग:प्रतिनिधी
कुडासे तिठा (ता. दोडामार्ग) येथे बेकायदेशीररी्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक/साठा करणाऱ्या एका इसमावर दोडामार्ग पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५,१०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.
​याप्रकरणी आरोपी प्रवीण लक्ष्मण धरणे (वय ४१, रा. साटेली भेडशी गावठाणवाडी, ता. दोडामार्ग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​महिला पोलीस अंमलदाराची फिर्याद
​या कारवाईबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल उर्मिला रमेश सातार्डेकर (मपोकॉ /६६७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

​दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली. कुडासे तिठा परिसरात गोवा बनावटीच्या दारूची अवैध रित्या साठवणूक किंवा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आणि ५,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
​या कारवाईत पोलीस हवालदार वसंत देसाई, विठोबा सावंत, अंकुश नाईक आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल उर्मिला सातार्डेकर यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वसंत देसाई (पोहेकॉ /७११) करत आहेत.