RAIN UPDATES: रात्री 11 वा. चिपळूणमधील वशिष्ठी नदीची पाणी पातळी ४ः७४ मी. म्हणजे इशारा पातळीपेक्षा कमी

Chiplun Taluka-
Date- 05.07.2026
Report Time- 11:00 PM

१)आज रविवारी Red Alert तर सोमवार व मंगळवार या दोन दिवसांकरीता रत्नागिरी जिल्ह्याला Orange Alert आहे.
२) चिपळूणमधील वशिष्ठी नदीची इशारा पातळी ही ५ मी आहे. आता रात्री ११ वा पाणी पातळी ४ः७४ मी. आहे. पाणी कमी होत आहे. आता ओहोटी सुरू आहे . आता पाऊसही कमी झालेला आहे. रात्री १०.४५ वा ओहोटी आहे.जगबुडी नदीची पाणी पातळी १०.१० मी असल्याने पाणी कमी होण्यास वेळ लागत आहे. जगबुडी नदीचे पाणी कमी होत आहे.
३) १० ते ११ या कालावधीत कोळकेवाडी परिसरात २१ मीमी पाऊस पडला आहे. तर सकाळी ८ वा ते सायं ११ वाजेपर्यंत १७४ मीमी पाऊस पडलेला आहे. कोळकेवाडी धरणाची पातळी १३५.१५ मी आहे. त्यामुळे १०ः२५ वा एक मशीन घेण्यात आलेली आहे.
४) नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये.
५) मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशानुसार सोमवार दि. ०६.०७.२०२६ रोजी शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.