वृद्धाचा मृतदेह चंपक मैदान येथील आंब्याच्या बागेत कुजलेल्या स्थितीत आढळला

रत्नागिरी : प्रतिनिधी
छत्तीसगड येथील कुटुंबापासून विभक्त राहणाऱ्या वृद्धाचा मृतदेह चंपक मैदान येथील आंब्याच्या बागेत कुजलेल्या स्थितीत आढळला.
सियाराम अमरसिंग देवांगण ( ६७,सध्या रा. चंपक मैदान येथील आंब्याच्या बागेत, रत्नागिरी,मुळ : छत्तीसगड) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवार 5 जुलै सायंकाळी 4 वा.सुमारास निदर्शनास आली. सियाराम देवांगण हा गेली पाच ते सात वर्षे कुटुंबापासून विभक्त होता. तो चंपक मैदान येथील आंबाच्या बागेत राहत असे. नातेवाईक त्याला अधून-मधून भेटायला यायचे.रविवारी त्याचा मुलगा किसन सियाराम देवांगण हा त्याला भेटण्यासाठी चंपक मैदान येथील आंब्याच्या बागेत गेला असता त्याला वडिल सियाराम हे जमिनीवर पडल्याने त्यांचे पुर्ण शरीर कुजलेल्या स्थितीत दिसले. या प्रकरणी किसन देवांगण यांने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.