-उपनगराध्यक्षा प्रा. सौ. रुपाली दांडेकर
चिपळूण (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्री विवेकानंद शाखा खेंड चिपळूणचे वतीने खेंड भागातील यशस्वी विद्यार्थी, कला-क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य मिळविलेल्या मंडळींचा सन्मान सोहळा श्रीगोपाळकृष्ण मंदिर (हवेली) येथे संपन्न झाला. दोनशे यशस्वीतांचा हा सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्षा प्रा. सौ. रुपाली दांडेकर उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या भारत मातेप्रती निष्ठा जपण्यासाठी संस्कारक्षम वाचनदेखील कराचे. त्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेंड विभाग प्रमुख प्रसाद केतकर यांनी करताना हा सोहळा शाखेतर्फे गेली तीन वर्षे करीत आहोत, तसेच अन्यही उपक्रम वर्षभर संघातर्फे सुरु असतात असे नमूद केले. मार्तंड माजलेकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांचे विशेष गुणकथन केले तर अमित पाटणकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना विद्याथ्यांनी शाखेत नियमित यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी खेंड प्रभागातील नगरसेवक अंकुश आवले, अजय भालेकर, शुभम पिसे, सौ. नीलम जाधव यांनी विद्याथ्र्यांना शाबासकी दिली आणि यापुढील आयुष्यात अधिक परिश्रम करुन भारताचे चांगले प्रामाणिक नागरिक वाहन केले. तसेच शिक्षणतज्ज्ञ नंदू, मर्डी यांनी अभ्यासाचे महत्त्व, अभ्यास कसा करावा, फक्त परीक्षेपुरता नको असे प्रतिपादन केले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत देवळेकर आणि परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका सौ. सारिका भाये यांनीही आपल्या भाषणात सन्मान सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक आशिष खातू तसेच संगीत तज्ज्ञ सौ. स्नेहल पालकर यांनी आपल्या मनोगतामधे विद्यार्थ्यांनी काही छंद, कला, तसेच क्रीडा विषयांमधेही पारंगत व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्माकर डांगे, संतोष चव्हाण, सुहास चव्हाण, दीपक भाटिया, विकास भाटिया, शेखर सायले, विजय चक्रदेव, विजय भोजने, संतोष चोगले, सी. प्राची जोशी, सौ. लीना भाटिया, बापू काणे, श्रीरंग चितळे, मोघे काका, अजय ओतारी आदि मंडळींनी परिश्रम घेतले. यावेळी सुमारे २६० यशस्वी विद्यार्थी, विद्याथिनी, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स आदि मंडळींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला गेला.












