आरएचपी फाउंडेशनचे पॅराप्लेजिक दिव्यांगांसाठी ३१ डिसेंबरला स्वयंचलन शिबिर

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाऊंडेशनतर्फे येत्या शनिवारी (ता. ३१) रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पॅराप्लेजिक (पाठीच्या कण्याला इजा झालेल्या) दिव्यांगासाठी स्वयंचलन कार्यशाळा मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. जिल्हा परिषदेच्या आवारातील शामराव पेजे सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. यात तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.

दिव्यांगासाठी कार्यरत असलेल्या आरएचपी फाउंडेशनने आतापर्यंत शेकडो दिव्यांगाना मदत केली आहे. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मेहनत घेतली आहे. शासकीय योजनांचा लाभ असो व युनिक आयडी, आधारकार्ड, मतदानकार्ड काढून देण्याकरिता सहकार्य केले आहे.

या शिबिराला जिल्ह्यातील सर्व पॅराप्लेजिक दिव्यांगानी उपस्थित राहावे, असे आवाहन आरएचपी फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो. नं. ८३२९५३४९७९ /९४०५४६१५४५ यावर संपर्क करावा.