यशस्वी विद्यार्थ्यांचे जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते सत्कार
वेंगुर्ले : प्रतिनिधी
रेडी येथील श्री देवी माऊली विद्यामंदिर या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रशालेच्या इयत्ता आठवीचा शिष्यवृत्ती चा निकाल शंभर टक्के लागला आहे. यातील तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
यामध्ये कुसमर्थ दीपक राणे (५९.३३ टक्के) गुण मिळवून वेंगुर्ले तालुक्यात आठवा. कुमारी प्राची शंकर गवंडी (५८.६० टक्के) गुण मिळवून तालुक्यात नववी तर कुमारी प्रांजल ज्ञानेश सावंत (५७.३० टक्के) गुण मिळवून तालुक्यात दहावी आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी माजी उपसरपंच दीपक राणे,शंकर गवंडी, ज्ञानेश सावंत तसेच रेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक कुणाल बांदेकर, श्रीमती पेडणेकर, माजी लिपिक उमेश करणेकर, लिपिक गौरव येसजी, गोविंद चिपकर प्रशालेचे विद्यार्थी तसेच पालक व रेडी ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












