जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त 19 जुलै रोजी अकॅडमिक अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर
जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त श्री चेस अकॅडमी, कणकवली व नवजीवन चेस अकॅडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 19 जुलै 2026 रोजी अकॅडमिक अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा दोन केंद्रांवर खेळविण्यात येणार असून, श्री चेस अकॅडमी, शिवाजीनगर, कणकवली येथे सकाळी 9.00 ते 12.30 आणि प्राथमिक शाळा MIDC, रेस्ट हाऊस नजीक, कुडाळ येथे सायंकाळी 3.00 ते 6.00 या वेळेत स्पर्धा होईल. प्रत्येक खेळाडूला या दोन केंद्रांपैकी कोणत्याही एका केंद्रावर सहभागी होता येईल.

स्पर्धा इयत्ता 1 ली ते 5 वी आणि इयत्ता 6 वी ते 12 वी अशा दोन गटांत आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. स्पर्धा Swiss लीगु पद्धतीने खेळविण्यात येईल व सर्व सामने FIDE च्या नियमांनुसार होतील.

प्रवेश फी 100 रुपये असून, नोंदणीसाठी 9422381949 या क्रमांकावर खेळाडूचे नाव, इयत्ता आणि GPay Payment Screenshot WhatsApp द्वारे पाठविणे आवश्यक आहे. नोंदणीची अंतिम तारीख 17 जुलै 2026 असून, दोन्ही केंद्रांवर मिळून केवळ 50 खेळाडूंनाच प्रवेश दिला जाणार आहे.

स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना गोल्ड मेडल, पुढील पाच विजेत्यांना सिल्व्हर मेडल, तर उर्वरित सर्व सहभागी खेळाडूंना ब्राँझ मेडलदेऊन गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण आडेलकर सर (मो. 9422381949)किंवा म्हापसेकर सर (मो. 9975482903) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.