शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी शिरोडा येथील सिद्धेश उर्फ भाई परब यांची नियुक्ती

वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी शिरोडा येथे शिवसेना पदाधिकारी श्री सिद्धेश उर्फ भाई विजय परब यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेनेच्या एका कार्यक्रमात शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते भाई परब यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी माजी पालकमंत्री दिपक केसरकर, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या सह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.