हडी जेष्ठ नागरिक संघाकडून गुणवंतांचा गौरव!

मसुरे | झुंजार पेडणेकर : फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील दहावी, बारावी, पदवी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता हडी जठारवाडी शाळा नंबर दोन येथे करण्यात येणार आहे. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत पाच ऑगस्ट पूर्वी अध्यक्ष देविदास सुर्वे, सचिव सुभाष वेंगुर्लेकर या संघाच्या पदाधिकाऱ्यांजवळ जमा करावि. यानंतर आलेल्या गुणपत्रिकेचा विचार केला जाणार नाही अशी माहिती ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने देण्यात आली आहे.