खेडशीतील व्यक्तीचा झोपेत मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथे राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा झोपेतच मृत्यू झाला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काशिनाथ महादेव पवार (५०, मूळ रा. कोंडगाव, बौद्धवाडी, साखरपा, ता. संगमेश्वर, सध्या रा. शिवलीला अपार्टमेंट, रूम क्र. २०२, स्वामीनगर, खेडशी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. काशिनाथ पवार हे १४ जुलैच्या रात्री जेवण करून झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेले होते. काही वेळानंतर त्यांच्या पत्नी कविता यांनी ते काहीच हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारी अशोक शिवराम मोहिते यांना बोलावले. त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता पवार हे बेशुद्ध अवस्थेत आढळले.
त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.