मढाळ ग्रा.पं.च्यावतीने मोफत वृक्ष वाटप

गुहागर प्रतिनिधी:
ग्रामपंचायत मढाळ येथे नुकतेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मढाळ गावातील ग्रामस्थांना खैराची रोपे मोफत वाटप करण्यात आली.
यावेळी वाटप करण्यात आलेली ही रोपे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच अंकिता चव्हाण उपसरपंच विकास सोलकर ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कारकर,अजित शिर्के,सेजल सोलकर,प्राची सोलकर, ग्रामपंचायत अधिकारी सी जी गोरिवले ग्रामपंचायत कर्मचारी सचिन सोलकर, ग्रामस्थ अशोक चव्हाण,संदीप चव्हाण, सुरेश शिर्के ,विलास कावणकर, सूर्यकांत सोलकर, गंगाराम कावणकर आदी उपस्थित होते.