वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद
वेंगुर्ले : दाजी नाईक
मूळचा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश येथील आणि सद्या तुळस घाडीवाडा येथे राहणारा भंगार विक्रेता छतीराम बाधू प्रजापती वय ४२ वर्ष याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वेंगुर्ले पोलिस ठाण्यात शत्रुघ्न जुगनू प्रजापती याने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, छठीराम बाधू प्रजापती हे खुप दारू पिऊन येऊन घरातल्यांना बडबडून आपल्या खोलीत शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी गेले. मात्र आज शनिवार दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ६.३० वाचण्याच्या सुमारास उठल्यानंतर त्याच्या पत्नी ने पाहिले असता तिला नवरा खोलीत गळफास घेऊन लटकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने आरडाओरड केली. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांना ही घटना समजून आली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. याप्रकरणी अधिक तपास एएसआय गवस करत आहेत.













