२२ जुलै ते २८ जुलै या कालावधीत होणार साजरा : प्रज्ञा परब
वेंगुर्ले : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त दि २२ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वेंगुर्ला महिला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सपन्न झाली. या बैठकीत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले, अशी माहिती महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब यांनी दिली.
दि २२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था येथे महिला बचत गट सक्षमीकरण, स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. २३ जुलै रोजी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दि. २४ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दिनांक २८ जुलै रोजी प्रगतशील शेतकरी महिला व पुरुष यांना अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशाप्रकारे विविध उपक्रमांनी जनसेवा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. या बठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव एम के गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, वेंगुर्ला तालुका महिला अध्यक्षा ऋतुजा शेटकर शहर अध्यक्षा सुप्रिया परब, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, शहर अध्यक्ष सुरज परब, युवती अध्यक्षा निधी शिरोडकर, प्रविणा खानोलकर, तेजस्वी गावडे, मिनाक्षी आरोंदेकर, सौ. तोडकर सुप्रिया जाधव, आदी उपस्थितीत होते.













