शिरगाव (प्रतिनिधी) : हवामानातील बदल, वाढते तापमान आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी श्री पावणाई विठ्ठलाई ग्रामस्थ मंडळ, तोरसोळे-राणेवाडी यांच्या वतीने श्री देवी पावणाई विठ्ठलाई मंदिर परिसरात ६५ शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली.
मंदिर परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक व्हावा, जैवविविधतेचे संवर्धन व्हावे तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने ग्रामस्थांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमादरम्यान लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेश राणे, सेक्रेटरी सत्यवान राणे, सचिव दिलीप राणे तसेच कार्यकर्ते प्रकाश अधिकारी, प्रवीण राणे, रमाकांत परब, रामचंद्र राणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













