केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
सावंतवाडी । प्रतिनिधी :“आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात २० तज्ज्ञ आणि ७० हून अधिक डॉक्टर सेवा देत असून, या उपक्रमाचा मतदारसंघातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे,” असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन संजू परब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
.संजू परब पुढे म्हणाले की, दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत या आरोग्य उपक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, रुग्ण कल्याण समिती सदस्य व आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी आणि नगरसेविका शर्वरी धारगळकर आदी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा सचिव परिक्षीत मांजरेकर, नगरसेविका स्नेहा नाईक, क्लेटस फर्नांडिस, आबा केसरकर, विश्वास घाग, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, राजश्री निर्गुण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत आणि के. एल. ई. हॉस्पिटलचे १०० हून अधिक डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी या शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिरात नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.













