चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटी चिपळूणतर्फे नुकताच चार्टर्ड अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अमृता श्रीकांत जोशी हिचा संस्थेच्या वतीने चेअरमन मंगेश तांबे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अतुल चितळे, प्राचार्य डॉ माधव बापट, उपप्राचार्या सौ.स्नेहल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अमृता जोशी हिने अकरावी व बारावीचे शिक्षण डीबीजे महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. बारावीनंतर तिने चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) हा अभ्यासक्रम निवडला. त्यानंतर पुण्यामध्ये पुढील शिक्षण घेतले आणि अथक परिश्रमाने तिने सी.ए ही पदवी संपादन केली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तिचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी तिच्या आईवडीलांचा देखील सत्कार करण्यात आला. मला केवळ शैक्षणिक ज्ञानच नाही तर आत्मविश्वास, शिस्त आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणाही या महाविद्यालयाने दिली. हा प्रवास आव्हानात्मक असला तरी माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी तसेच शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे मी CA परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. आज माझ्या या यशाबद्दल महाविद्यालयाने माझा सत्कार केल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. या महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते, अशी भावना तिने व्यक्त केली. यावेळी संस्थेचे माजी चेअरमन सुचय रेडीज, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, प्रा.सौ.सोनाली वराडे, प्रा.सौ.मिता तांबे आदी उपस्थित होते.













