रमेश काद‌वडकर यांची राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या रत्नागिरी जिलाध्यक्ष पदी निवड

चिपळूण (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या रत्नागिरी जिलाध्यक्ष पदी रमेश काद‌वडकर यांची निवड निवड करण्यात आला आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय महाराष्ट्र प्रदेश कमिटीची आढावा बैठक यशस्वी पार पडली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, प्रदेश खजिनदार आ. शिवाजीराव गर्जे, आ. संजय बनसोडे, माजी आमवार बहू कानडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. सुनिल मगरे, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल सावर्डेकर यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा सामाजिक न्याय कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रमेश कादवडकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातून सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. तसेच चिपळूणमधून विशाल जानवलकर, तालुकाध्यक्ष सुरेश कादवडकर, प्रकाश चिपळूणकर, लक्ष्मीकांत देवरूखकर, खेड तालुकाप्रमुख (सामाजीक व न्याय विभाग) केतन पेवेकर आदी उपस्थित होते.