चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची सभा दि. ३० जून रोजी प्राथमिक शिक्षक पतपेढी, आरोग्य मंदिर रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये अनंत सीताराम मोहिते यांची सर्वानुमते पदवीधर शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीसपदी नरेश सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष संजय डांगे, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ गोरे, जिल्हा नेते पदी दीपक माळी यांची निवड करण्यात आली. तसेच विश्वनाथ सुर्वे, प्रकाश कामेरकर, प्रवीण त्रिभुवने, मनोज मिरगुले, कार्यालयीन चिटणीस पदी शीतलकुमार आकुर्डे, सहकोषाध्यक्ष पदी सचिन कापसे, कार्यकारीणी सदस्यपदी सुनील करंबेळे, उदय घाडी, राजेश गुरव, प्रशांत दळवी, जिल्हा महिला प्रतिनिधी पदी सौ. भारती तायशेटे, सौ. प्रियांका सनगरे, सौ. पूजा साळवी, सौ. विलेशा भोसले, सौ. प्रार्थना देसाई, जिल्हा संघटक पदी संजय कुळये, प्रबोध चव्हाण, संदीप मोहिते, समीर घडशी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी राजेश गोसावी, सल्लागार पदी चंद्रकांत पावसकर, संजय दरेकर, अशोक भालेकर, विजय जाधव, उदय शिंदे, संदीप कालेकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी उदय शिंदे, चंद्रकांत पावसकर, संतोष पेवेकर, संजय विश्वासराव, सुनील करंबेळे, विजय जाधव, राजेश गुरव त्याचबरोबर जिल्ह्यातील पदवीधर संघटनेचे तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.












