छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे शासनाचे आभार…
वेंगुर्ले : प्रतिनिधी
सन २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षीची विमा नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना योग्य वेळेत उदाहरणार्थ शेतीचा खरीप हंगाम चालू असताना मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याबद्दल आम्ही शासनाचे तसेच कृषिमंत्री, आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करत असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष शामसुंदर राय यांनी सांगितले.
सद्या खरीप हंगाम सुरू आहे आणि शासनाने फळपिक विमा रक्कम प्रथमच या वर्षी वेळीच दिली आहे. कलमांना खाते घालण्यासाठी शेतकऱ्यांना खरं याची मदत मिळाली आहे.
त्याचप्रमाणे हवामानाच्या बदलामुळे चालू वर्षी झालेल्या आंबा काजू नुकसानी संदर्भात विमा नुकसान भरपाई प्रमाणे तळ कोकणात व सिंधुदुर्गासाठी जास्तीत जास्त लक्ष दिले या अनुषंगाने सध्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंबा काजूचे नुकसान लक्षात घेता शासनाने निकषात राहून दिलेली नुकसान भरपाई म्हणजेच एनडीआरएफ याच्याही बाहेर जाऊन नुकसान भरपाई मिळण्या करिता मान. मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश राणे साहेब यांनीही यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घातलेले आहे त्यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल अशी ही शेतकरी वर्गातून अपेक्षा होत आहे, असेही म्हटले आहे.












