38 सुवर्णपदक, 30 रौप्य पदक, 21 कांस्य पटकावून फाईट मध्ये द्वितीय क्रमांकाचा चषक व पुमसेमध्ये द्वितीय क्रमांकाचा चषक संगमेश्वर तालुक्याने पटकावला
देवरूख (प्रतिनिधी):
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने व संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लबच्या संयुक्त विद्यमाने २४ वी सब-जुनियर व जुनिअर व ९ वी कॅडेट,२४ वी सीनियर क्युरोगी व १३ सब-जुनियर,९ वी कॅडेट, १३ वी ज्युनियर व सीनियर पुमसे तायक्वांदो स्पर्धा सन २०२६ ओमेगा गार्डन हॉल सावरकर चौक देवरुख,या ठिकाणी दिनांक १० ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी,लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, तालुक्यांमधून सुमारे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, तालुक्याचे आमदार तायक्वांदो खेळाचे आधारस्तंभ शेखर निकम सर,जिल्हा संघटना अध्यक्ष राज्य संघटना खजिनदार श्री व्यंकटेश्वरराव कर्रा,जिल्हा सचिव लक्ष्मण के,जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड,पंच प्रमुख भरत कर्रा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन तालुक्याचे आमदार शेखर निकम सर यांच्या हस्ते पार पडले या वेळी माजी राज्यमंत्री रविंद्र माने, देवरुख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले,तालुक्याच्या सभापती शर्वरी वेले, उपसभापती प्रफुल्ल बाईत, जिल्हा संघटना अध्यक्ष व राज्य संघटना खजिनदार वेंकटेश्वरराव कर्रा, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, क्लब उपाध्यक्षा ॲड सौ.पुनम चव्हाण, जिल्हा संघटना खजिनदार तालुका सचिव शशांक घडशी,रुपाली कदम, बाळु ढवळे, पंकज पुसाळकर, नगरसेवक यशवंत गोपाळ, सौ.आंबेकर , तालुका अकॅडमीचे खजिनदार चिन्मय साने, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, पालक प्रतिनिधी आदिती लोध,प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार, साईप्रसाद शिंदे,पदाधिकारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फाईट स्पर्धेमध्ये चिपळूण तालुक्याने प्रथम क्रमांकाचा चषक व संगमेश्वर तालुक्याने द्वितीय क्रमांकाचा चषक व एस आर के तायक्वांदो क्लबने तृतीय क्रमांकाचा चषक पटकावला, पुमसेमधे युवा तायक्वांदो क्लबने प्रथम क्रमांकाचा चषक व संगमेश्वर तालुक्याने द्वितीय क्रमांक चषक व चिपळूण तालुक्याने तृतीय क्रमांकाचा चषक प्राप्त केला बक्षिक समारंभ देवरुख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्त्ये, जिल्हा संघटना अध्यक्ष राज्य संघटना खजिनदार वेंकटेश्वरराव कर्रा, क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, जिल्हा संघटना खजिनदार तालुका प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, क्लब उपाध्यक्षा ॲड. सौ पुनम चव्हाण, रुपाली कदम,दुर्वा मोघे, मृण्मयी सावंत, पिहू कांगणे, पवित्रा मसुरकर, अनुराधा माळी, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार, साईप्रसाद शिंदे, संकेत मापुस्कर, पंकज मेस्त्री, राहुल चव्हाण,मयुरी राऊत व सर्व पदाधिकारी व तालुक्यातून आलेले सर्व प्रशिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्र संचालन माजी केंद्र प्रमुख अभिमन्यु शिंदे.
या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब व लायन्स तायक्वांदो क्लब संगमेश्वर या सर्व क्लबचे खेळाडू संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये संगमेश्वर तालुक्याच्या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत फाईटमध्ये द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावला,पुमसे मध्ये द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावून अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले सुवर्णपदक प्राप्त पटकाविलेल्या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे. या सर्व यशस्वी तायक्वांदो पट्टूंना प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमित पवार,यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्याच्या वतीन राष्ट्रीय पंच साईप्रसाद शिंदे,मयुरी राऊत, ओम घाग यांनी काम पहिल. त्यांच्या यशाबद्दल तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, देवरुख शहराच्या माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड, तालुक्याचे प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी,राज्य संघटना सदस्य व्यंकटेश्वरराव कर्रा, देवरूख शहराचे माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये,जिल्हा प्रमुख प्रशिक्षक लक्ष्मण कर्रा, तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, उपाध्यक्षा ॲड.सौ पुनम चव्हाण, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे,सामाजिक कार्यकर्ते युयुत्सुु आर्ते, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सिनियर खेळाडू सौरभ वनकर, निखिल लाड, सानिका प्रसादे, संकेत मापुस्कर,पंकज मेस्त्री, सुशांत मेस्त्री,सिद्धी केदारी, वेदांत गिडिये ,पालक प्रतिनिधी आदिती लोध, क्लब सदस्या रुपाली कदम,स्वाती नारकर, अनुजा नार्वेकर,अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे आदींनी शुभेच्छा दिल्या आहे.













