तिरवडे येथे सखी महिला शेतकरी गटाचा नैसर्गिक पद्धतीने भात लागवडीचा यशस्वी प्रयोग

l

 

वैभववाडी :

शाश्वत व विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देत मौजे तिरवडे तर्फे खारेपाटण येथील ‘सखी महिला शेतकरी गटा’ने नैसर्गिक पद्धतीने भात लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. गोकृपा अमृताची रोप प्रक्रिया, गिरिपुष्पाच्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर तसेच SRI (श्री) पद्धतीने भात लागवड करण्यात आली.

यावेळी उप कृषी अधिकारी आनंद पाटील, कृषी सेवक रवींद्र काळे यांच्यासह श्री. रामदास तानाजी घुगरे व महिला शेतकरी गटाच्या सदस्यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी महिलांना SRI पद्धतीचे तंत्रज्ञान, लागवडीचे अंतर व सेंद्रिय खतांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. महिला शेतकऱ्यांचा हा उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.