आवळा, बोरांना ग्राहकांची पसंती हसन तडवी देत आहेत ग्राहकांना सेवा

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी या बाजारपेठेत हसन तडवी हे सणानिमित्त तसेच ग्राहकांच्या आवडीनुसार फळं उपलब्ध करत असतात. सध्या हसन तडवी यांनी विविध प्रकारच्या बोर उपलब्ध केली आहेत. बोरांनी लहानापासून मोठ्यापर्यंत आपल्या चवीचे वेड लावल्याचे पाहायला मिळेत तसेच आपल्या स्टॉलवर पित्त, कप, वात अशा अनेक आजारावर उत्तम औषध असणारा आवळा उपलब्ध करून देत ग्राहकांची आवड जोपासली आहे.
शृंगारतळी बाजारपेठेमध्ये गेल्या १५ ते १६ वर्षांपासून हसन तडवी हे फळविक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांची गुहागर तालुक्यातील अनेक ग्राहकांची नाळ जुळली आहे. कमी भाव तसेच आश्वासक सेवा मिळत असल्याने तडवी हे ग्राहक वर्गामध्ये चांगलेच परिचित आहेत. आपल्या फळ विक्रीच्या स्टॉलवर ते संफरचद, मोसंबी, पेरू, चिंच, केळी, आवळा, आंबे, द्राक्षे अशी विविध फळे विक्रीसाठी ठेवतात. हसन तडवी यांनी नदीतील गाळ काढणे, पुरग्रस्तांना मदत, अंध शाळेमध्ये जाऊन मुलांना वह्या वाटप अशी अनेक सामाजिक कामे केली आहेत