खेडमधील चिकन सेंटरमध्ये आला साप आणि…

Google search engine
Google search engine

खेड : खेड मधील भडगाव येथे अतिश उसरे यांच्या चिकन सेंटरमध्ये तस्कर (Trinket Snake) प्रजातीचा साप आल्यानर एकच खळबळ उडाली.

याची माहिती दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. कळविलेल्या माहितीच्या अनुषंगाने सदरील तस्कर प्रजातीच्या सापाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यात घेवून त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून जीवनदान देण्यात आले. या बचावकार्यात श्री परमेश्वर डोईफोडे, वनरक्षक खेड यांनी श्री.सुरज जाधव, श्री. सर्वेश पवार, श्री. रोहन खेडेकर, व श्री. श्वेत चोगले यांच्या मदतीने तस्कर प्रजातीच्या सापाला ताब्यात घेवून देवना येथे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

सदरचे बचावकार्य श्री. वैभव बोराटे परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, यांचे मार्गदर्शनाखाली श्री परमेश्वर डोईफोडे,वनरक्षक खेड यांनी श्री. सुरज जाधव, श्री. सर्वेश पवार, श्री. रोहन खेडेकर, व श्री. श्वेत चोगले यांचे समवेत पूर्ण केले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.