प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: कंदलगाव हद्दीतील गिरगाव रोडवरील पालकोबाच्या डोंगर परिसरात महादेव धाऊ बोडके (वय ४५, मूळ साळवण-निवडे, सध्या रा. बोंद्रेनगर) या रिक्षाचालकाचा निर्घृण खून झाल्याची घटना २२-२३ जुलै २०२६ च्या सुमारास उघडकीस आली आहे.त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार करून गळ्याभोवती नायलॉनची दोरी आवळल्याचे समोर आले असून, त्यांची रिक्षा आणि अंगावरील सोनसाखळी गायब आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,कंदलगाव हद्दीतील पालकोबाचा डोंगर परिसरातील गिरगाव मुख्य रस्त्यापासून सुमारे शंभर फुटांवर शेताच्या बांधावर मृतदेह असल्याची बातमी पसरली. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजित पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय आहे.
मृताच्या डोक्यात, चेहऱ्यावर दगडाने घाव घातल्याने चेहरा ओळखणे मुश्किल झाले होते.
दरम्यान, मंगळवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास महादेव बोडके हे रिक्षा घेऊन घराबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने पत्नी मंगल यांनी बुधवारी पहाटे करवीर पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
मृतदेहाजवळ मिळालेल्या मोबाईलआधारे तसेच बोडके यांच्या कुटुंबियांना बोलावून मृताची ओळख पटविण्यात आली.
बोंद्रेनगरात राहणारे बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच नवीन रिक्षा घेऊन शहरात भाडेतत्त्वावर चालवत होते.
खुनामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत.













