एक पेड मां के नाम या उपक्रमाला गुहागर केंद्रामध्ये अभूतपूर्व प्रतिसाद

गुहागर प्रतिनिधी:
पंचायत समिती गुहागर अंतर्गत गुहागर केंद्रामध्ये एक पेड मा के नाम या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. शाळा घर परिसर शेत यामध्ये झाडे लावली जात आहेत. गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरने या उपक्रमाची केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील सर व मुख्याध्यापिका सुजाता कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेड मा के नाम या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी प्रगतशील शेतकरी दर्शन देवकर व माजी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर , नाईक सर ,संतोष मोहिते सर, अविनाश गमरे सर, माने मॅडम इत्यादी मान्यवर होते. गुहागर हायस्कूल ने २१८ झाडे, गुहागर नंबर दोन शाळेने १६ झाडे ,असगोली नंबर एक शाळेने ९२ झाडे ,गुहागर नंबर एक शाळेने ३६ झाडे ,आरे देवराठी शाळेने १० झाडे ,आरे भंडारवाडा शाळेने १५ झाडे गुहागर उर्दू शाळेने पाच झाडे ,असगोली नंबर दोन शाळेने पाच झाडे ,अन्नपूर्णा विद्यालयाने ४० झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. आहे .असगोली नंबर एक शाळेमध्ये एक पेड मा के नाम या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रप्रमुख मनोज पाटील ,मुख्याध्यापक चंद्रकांत झगडे, पोलीस कॉन्स्टेबल दिपाली गुरव, पोलीस कॉन्स्टेबल सारिका चाळके , उपक्रमशील शिक्षक प्रदीप पवार ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य स्वाती नाटेकर, अन्वी पावरी, अंजली मुद्दमवार ,दीक्षा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना केंद्रप्रमुख गाव मनोज पाटील म्हणाले एक पेड मा के नाम या उपक्रमाला गुहागर केंद्रातील शाळांमध्ये उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे .विद्यार्थी शाळेच्या परिसरात व आपल्या शेतामध्ये झाडे लावत असून झाड हे पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण अनिवार्य भाग आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे.