गुहागर प्रतिनिधी:
श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर येथे शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा यामध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांचे वतीने माननीय श्री दीपक कनगुटकर साहेब, संदीप भोसले साहेब व केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील सर, विषय शिक्षक शिवानंद साखरे सर व पदाधिकारी यांचे हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्याध्यापिका सुजाता कांबळे मॅडम, उप मुख्याध्यापिका मनीषा सावंत मॅडम ,पर्यवेक्षिका गायत्री कनगुटकर मॅडम ,सर्व शिक्षक उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसोबतच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संतोष मोहिते सर,प्रदीप जाधव सर, मधुकर गंगावणे सर, वैभव ढोणे सर, सुचिता ठाकूर मॅडम, उत्कर्ष कांबळे मॅडम ,राधा शिंदे मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील म्हणाले की गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेचा निकाल सातत्याने दरवर्षी अतिशय चांगल्या प्रकारे लागत असतो. त्यासाठी सर्व शिक्षक समर्पित भावनेने अध्यापनाचे कार्य करीत असतात.











