मिसिंग रायझिंग फ्लॉवर उपक्रमांतर्गत प्रभानवल्ली व व्हेळ विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लांजा पोलीस ठाणे मार्फत सायबर फसवणुकीबाबत
विद्यार्थ्यांसाठी जनजागृती

लांजा (प्रतिनिधी): मिसिंग रायझिंग फ्लॉवर उपक्रमांतर्गत, लांजा पोलीस ठाणे मार्फत तालुक्यातील प्रभानवल्ली व व्हेळ विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मार्गदर्शन केले. .सायबर जागरूकता :- सायबर फसवणुकीचे प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, डिजिटल गोपनीयता, ऑनलाइन सुरक्षितता आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी करावी. अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व, अल्पवयीन वाहनचालना टाळणे आणि जबाबदार नागरिक म्हणून रस्ते सुरक, चांगला व वाईट स्पर्श यातील फरक, वैयक्तिक सुरक्षितता, अनुचित वर्तनाची त्वरित माहिती विश्वासू व्यक्तींना देणे आणि बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमातील विविध तरतुदी आणि त्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले.
तसेच पोलीस दल व इतर शासकीय सेवांमधील करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षांची माहिती, कौशल्य विकासाचे महत्त्व व करिअर नियोजन याबाबत योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले.
सदर कार्यक्रमाकरिता शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, पालक, पोलीस पाटील, माजी विद्यार्थी संघटना सदस्य, सरपंच ,उप सरपंच हजर होते.
सदर कार्यक्रमाच्या नंतर विद्यालयांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लांजा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे ,बिट अंमलदार विलास जाधव , माजी सरपंच सुरेश शिगम , स्थानिक संस्थापक दिलीप पळसुलेदेसाई , वाघणगावचे शिक्षक चंद्रकांत कांबळे , पो पा . व्हेळ , मोगरगाव आणि वाघणगाव
मुख्याद्यापक रमेश तरवडेकर उपस्थित होते.