गुहागर | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ व रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजातील उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. गुरुकृपा मंगल कार्यालय, पऱ्याची आळी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश व कायदे सल्लागार डी. एस. जामखेडकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष सतीश वैरागी, प्रांतिक तैलिक सेवा आघाडी राज्य उपाध्यक्ष विनायक राऊत, प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग सचिव चंद्रकांत झगडे, कोकण विभाग कार्याध्यक्ष गणेश धोत्रे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.तसेच संदेश पांडुरंग रहाटे हे व्यवसाय मार्गदर्शन व परिक्षांची तयारी यावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी या गुणगौरव समारंभासाठी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी केले आहे.











