विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचार पूर्वक निवडावे — प्राध्यापक मिलिंद कडवईकर

कुणबी विकास सहकारी पतसंस्था लांजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

लांजा (प्रतिनिधी): कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, लांजा यांच्या वतीने आयोजित शिक्षण, कला, कृषी व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ नुकताच कुलकर्णी काळे छात्रालय, लांजा येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच कुणबी समाजातील इयत्ता दहावीमध्ये ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या आणि इयत्ता बारावीमध्ये ७० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली.
याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात बी.ए.एम.एस. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉ. आकांक्षा सनगरे, राज्य शासनाचा कृषी क्षेत्रातील वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त दयानंद चौगुले, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल कु. ईश्वरी सुवारे तसेच राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यीनी आरोही शिंदे या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिलिंद कडवईकर यांनी विद्यार्थ्यांनामार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचार पूर्वक निवडावे आपली आवड,क्षमता,व भविष्यात असणाऱ्या संधी यांचा मेळ घातला जाणे आवश्यक आहे.लहानवयातच आपलीआवड ओळखली रे भविष्यात यशस्वी होणे फार कठीण नाही.त्यांनी पुढे विविध करिअर पर्यायांची माहिती दिलीच शिवाय आवश्यक असलेल्या सीईटी तसेच स्पर्धा परीक्षा यासाठी आवश्यक तयारी कशी करावी याची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक शांताराम गाडे, नंदकुमार आंबेकर, भालचंद्र कांबळे, संचालिका सौ. दर्शना बेंद्रे, सौ. प्रज्ञा हरमले, मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप डाफळे, शाखाधिकारी संतोष घडशी, गंगाराम कालकर, सचिन रामाणे, महेश बर्वे तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी, नाना मानकर, सुधाकर कांबळे, शरद खांदारे, हरिश्चंद्र मंचेकर निलेश सुवारे, सौ. निलांबरी परवडी , सौ. वृषाली दरडे, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष विलास दरडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रभाकर सनगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप डाफळे यांनी केले.