अर्जुना धरण १००% भरले! सांडव्यावरून विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

*राजापूर प्रतिनिधी

मंगळवार दिनांक 28/07/2026 रोजी सकाळी 7:00 वाजता राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण 100% भरले असून सांडव्यावरून 2.41 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण व अनुषंगिक भागात प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे.तसेच धरणावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्र, नाले तसेच धरणाच्या परिसरात किंवा अनुषंगिक भागात प्रवेश करू नये. स्वतःची व इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
*आजची धरणस्थिती* :
प्रकल्प : अर्जुना मध्यम प्रकल्प, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
पाणीपातळी : 177.05 मी.
उपयुक्त पाणीसाठा : 72.56 द.ल.घ.मी.
साठा : 100%
आजचा पाऊस : 74 मिमी
1 जून 2026 पासून एकूण पर्जन्यमान : 2001 मिमी
सांडवा विसर्ग : 2.41 क्युमेक्स
विमोचक विसर्ग : 0.00 क्युमेक्स
*सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे असे आवाहन राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.