दोडामार्ग (प्रतिनिधी):धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित श्री नवदुर्गा माध्यमिक विद्यालय, आयी या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. अंकुश शांताराम मिरकर हे 33 वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सपत्निक भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा शुक्रवार, दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रशालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमाला माजी विदयार्थी शिक्षण प्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रशाळेच्या वतीने करण्यात आले आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था कार्याध्यक्ष डॉ. श्री. मिलिंद प्रतापराव तोरसकर हे असणार आहेत.या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत
यावेळी सौ. रश्मी मिलिंद तोरसकर (कार्यकारिणी सदस्या तथा सचिव – समन्वय समिती, श्री बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई)श्री. नंदकुमार नारायण नाईक (सहसचिव – समन्वय समिती, संस्था तथा प्राचार्य – न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भेडशी) श्री. चंद्रकांत वासुदेव पर्येकर (सदस्य – समन्वय समिती तथा शालेय समिती) श्री. सुरेश अर्जुन सावंत व श्री. उत्तम रामा गवस (शालेय समिती सदस्य, आयी)सौ. उज्ज्वला घारो पर्येकर (माजी मुख्याध्यापिका, श्री नवदुर्गा माध्यमिक विद्यालय, आयी)
सौ. वंदना सावंत (सरपंच, ग्रामपंचायत तळेखोल) श्री. तुषार नाईक (सरपंच, ग्रामपंचायत आयी)श्री. देवानंद एकावडे (पोलिस पाटील, आयी)
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीम. कल्पना प्रतापराव तोरसकर, सचिव मा. श्री. संतोष सावंत, खजिनदार मा. श्री. वैभव नाईक तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आदींना निमंत्रीत करण्यात आले आहे
या निवृत्ती सत्कार सोहळ्यास सर्व माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी मुख्याध्यापक श्री. सुरेश राठोड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले आहे.












