मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत कलमठ ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर ; विजेत्यांचा केला सत्कार

 

कणकवली | मयुर ठाकूर : मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत मध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

चित्रकला स्पर्धेत जि. प. शाळा कलमठ बाजारपेठे नं. १ मधील दिया नितेश पायसवाडकर ( प्रथम क्रमांक ), दूर्वा सिद्धेश घाडीगावकर ( द्वितीय क्रमांक ), स्वप्निल मनीष मेस्त्री ( तृतीय क्रमांक ), रुही दिनेश पाटील ( उत्तेजनार्थ ) तसेच जि. प. प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी येथील रमेश विश्वजीत चिंदरकर ( प्रथम क्रमांक ), ओमकार बसवराज हेळवर ( द्वितीय क्रमांक ), शनाया गुलाबहुसेन धारवाडकर ( तृतीय क्रमांक ), विघ्नेश संतोष देसाई ( उत्तेजनार्थ ) तर जि. प. प्राथमिक शाळा कलमठ, गावडेवाडी येथील गौरांश सुशील डवर ( प्रथम क्रमांक ), विघ्नेश संतोष बांदिवडेकर ( द्वितीय क्रमांक ), साधना डब्ल्यू लोधी (तृतीय क्रमांक ), शिवतेज साताप्पा पाटील ( उत्तेजनार्थ ) या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले.

तर निबंध स्पर्धेत जि. प. शाळा कलमठ बाजारपेठ नंबर १ मधील दिया निलेश मेस्त्री ( प्रथम क्रमांक ), वेदिका मनोज घाडीगावकर ( द्वितीय क्रमांक ), सोनी राजेश निषाद ( तृतीय क्रमांक ), स्वराज महेंद्र कुमार आडोळे ( उत्तेजनार्थ ) तसेच जि. प. शाळा कलमठ कुंभारवाडी कु. संकल्प नरेंद्र चिंदरकर ( प्रथम क्रमांक ), कु. अस्मि गणेश पावसकर ( व्दितीय क्रमांक ), कु.नमिष विवेकानंद चिंदरकर ( तृतीय क्रमांक ), कु. अस्मि दिनेश वावळीये ( उत्तेजनार्थ ) तर जि. प. प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी आरोही विशाल जाधव (प्रथम क्रमांक ), हर्ष दीपक पवार (द्वितीय क्रमांक ), गौरांश सुशील डवर ( तृतीय क्रमांक ), हेमंत पांडुरंग गावकर ( उत्तेजनार्थ ) यांनी यश मिळविले.

तर निपुण भारत अभियान सन – २०२२/२३ अंतर्गत माता-पालक गटाचे उत्कृष्ट काम व शैक्षणिक गुणवत्तेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल पुढील गटांना सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले.

सावित्री गट – कलमठ लांजेवाडी, जुई गट – कलमठ बाजारपेठ, हिरा गट – कलमठ सुतारवाडी, जाई गट – कलमठ बाजारपेठ, मोगरा गट – कलमठ बाजारपेठ, जिजाई गट – कलमठ, शिवाजी गट – कलमठ बीडेवाडी, सावित्रीबाई फुले गट – कलमठ, इंदिरा गट – कलमठ,