समाजसेवा हीच खरी परमेश्वर सेवा: प.पू. गावडे काका महाराज

 ▪️ योगभवनाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार.

▪️माड्याचीवाडी स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

▪️ महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून हजारो भाविकांची उपस्थिती.               

मसुरे | झुंजार पेडणेकर : अंधकारातुन प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग सदगुरू आहेत सेवाभावी भक्तीतून दुसऱ्याची सेवा केली पाहिजे तरच आपली परमेश्वर रुपी भेट होते.समाजाची सेवा हाच समाज रुपी परमेश्वर आहे. गुरुची कृपा व गुरुचा आशीर्वाद हाच मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग आहे असे प्रतिपादन श्री श्री 108 महंत मठाधीश प पू.सदगुरू गावडे काका महाराज यांनी माडयाचीवाडी येथे गुरूपौर्णिमा सोहळ्यात केले. गुरुपौर्णिमेच्या दिनी श्री स्वामी मठात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यातील माडयाचीवाडी खालचीवाडी येथील श्री श्री 108 महंत मठाधीष परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठात  गुरुपौर्णिमा उत्सव आज भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला पहाटे   संकल्प, गुरु मंत्र, सकाळी स्वामींच्या मूर्ती वरती धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा व आरती  श्री श्री 108 महंत मठाधीश  परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज यांची पाद्यपूजा   दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्यानंतर गुरु संदेश दुपारी सदगुरू दर्शन सोहळा व अखंड महाप्रसाद  आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काकांची पाद्यपूजा सावंतवाडीतील उद्योजक चंद्रशेखर पोकळे यानी केली. यावेळी श्री सदगुरू भक्त सेवा न्यास रजि. माड्याचीवाडी अध्यक्ष एकनाथ गावडे,सामाजीक संस्थेचे अध्यक्ष राकेश केसरकर, पंकज कामत, , सुजय गावडे गौरव मुंज,सचीन धावडे, भास्कर गावडे, राजन गावडे, विजय साहील, नामदेव गावडे, बापू गावकर,सौ केसर वानीवडेकर, सौ प्रिती कुशे, सौ रश्मी डिचोलकर,बाबा गावडे, मनीष नाईक, गिरीधर गावडे, देवीदास रेडकर, साईपेडणेकर, आनंद सावंत

दत्तात्रय किंनळेकर, कृष्णा पाटकर, तानाजी पाटील,नितीन  पिंगुळकर, तुकाराम आमुनेकर, राजु वाळके, अंजली पावसकर, तसेच महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते

गावडेकाका महाराज यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजात वावरताना एक माणूस म्हणून जगा. गरिबांची सेवा करा. त्यांच्या मदतीला धावून जा. पाप पुण्याच्या विळख्यातून बाहेर पडत पुण्य कर्म करा. हीच माझ्यासाठी तुम्ही दिलेली गुरूदक्षिणा आहे  गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असतं. मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग मिळविण्याचं व मनाला एकाग्रता ज्या ठिकाणी मिळते ते ठिकाण‌ म्हणजे सदगुरूचे चरण. अध्यात्मिक सदगुरु आपणाला चांगल्या वळणावर नेतात व शेवटच्या क्षणापर्यंत आपणाला मायेने व ममतेने वात्सल्याने ,दिव्यत्वाचा संदेश देत असतात. यावेळी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थाचा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ व श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या सामाजीक संस्थेच्या माध्यमातून योग अभ्यास वर्ग डिल्पोमा अभ्यासक्रम चालवीला जातो. यामध्ये यशस्वी विद्यार्थाचा गुण गौरव करण्यात आला. सांताक्रुज केंद्रांसाठी संस्थेची स्वत:ची वास्तू व्हावी यासाठी विशेष पुढाकार घेणारे संस्थेचे विश्वस्त सचीन धावडे यांचा सदगुरूच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मसदे मठाचे श्रीकृष्ण पाटकर, साईप्रसाद पेडणेकर, तानाजी पाटील, कोमल पेडणेकर, रसिका हिवाळे कर, आदिती मेस्त्री,सिद्धेश खोत,प्रा॑जल बिलये, चंद्रसुहास घाडी, संतोष निगु॔ण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राकेश केसरकर, मनीष नाईक, आनंद सावंत यांनी केले.

▪️योगभवन हीच तुम्ही दिलेली गुरुदक्षिणा भेट- गावडेकाका महाराज

समाज सर्वागीण विकास आणि प्रगतीसाठी योगभवन उभे राहणे हीच तुमच्याकडून मी गुरूदक्षिणा स्वीकारली आहे. भव्य योगभवनाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे .भविष्यात समाजासाठी विविध उपक्रम राबवित असतानाच रोगानुसार योगा हा नवीन उपक्रम राबवणार असल्याचे गावडे काका महाराज यांनी जाहीर केले. तसेच समाजासाठी जिल्ह्यासाठी क्षय मुक्त भारतसाठी सदगुरू भक्त सेवा न्यास गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असून सेवेचा हा वसा अखंड असणार आहे असे सांगितले.