चिपळुणात भामट्यांचा सुळसुळाट! गोवळकोट आणि बायपास रोडवर बंद घरे फोडली; लाखांचा मुद्देमाल गायब

चिपळूण:
गोवळकोट रोडवरील अल नजु अपार्टमेंट (ए-विंग, रूम नंबर १०५) या इमारतीतील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात भामट्याने बेडरूमच्या कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ३० जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.४० च्या सुमारास घडली.
​चोराने अल नजु अपार्टमेंटमधील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा अज्ञात हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले सोन्याचे विविध दागिने आणि रोख रक्कम चोरून पोबारा केला. याच सुमारास बायपास रोड परिसरातील द्वारका कृष्णकुंज बिल्डिंग मधील एका घरातही अशाच प्रकारे चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.
​या घटनेबाबत रात्री चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या घरफोडीचा अधिक तपास करत आहेत