मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त दाभोली भागातील शाळांमध्ये मुलांना टिफीन बॉक्स वाटप..

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या टप्यात वेंगुर्ले तालुक्यातील शाळा दाभोली नंबर २, पूर्ण प्राथमिक खानोली शाळा नंबर १ आणि खानोली आंबेसवाडी शाळा येथील शाळकरी मुलांना शनिवारी टिफीन बॉक्स वाटून मुलांसोबत मनीष दळवी यांचा वाढदिवस साजरा केला.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, प. स. सदस्य. शितल श्रीकृष्ण बांदवलकर-राऊत, दाभोली सरपंच उदय गोवेकर, खानोली सरपंच सुभाष खनोलकर, दाभोली उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, वेतोरे ग्रामपंचायत सदस्य संगिता संदिप नाईक, दाभोली ग्रामपंचायत सदस्य शामल मिशाळे, माजी. ग्रामपंचायत उपसरपंच सौ. यशश्री योगेश नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य विलासीनी विलास नाईक, खानोली ग्रामपंचायत सदस्य सुनील घांग, सौरभ नाईक, सामाजिक कार्यकर्ते योगेश नाईक, यतीन आवळेगावकर आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.