सचिवपदी मुकुल सातार्डेकर : बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात ३० जून रोजी पदग्रहण सोहळा
वेंगुर्ले : दाजी नाईक
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन या क्लबची सन २०२६-२७ या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी अँड, प्रथमेश नाईक, सचिवपदी मुकुल सातार्डेकर, उपाध्यक्षपदी पंकज शिरसाट तर खजिनदारपदी विष्णू उर्फ उदय दाभोलकर यांची सर्वानुमते निवड झालेली आहे. या नूतन कार्यकारिणी पदाधिकारी पदग्रहण सोहळा बेळगाव येथील नवनियुक्त डिस्ट्रीक गव्हर्नर अशोक नाईक यांच्या हस्ते मंगळवार ३० जून रोजी वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालयानजीकच्या बॅ. नाथ पै समुदाय केंद्रामध्ये सायंकाळी ७ वाजता संपन्न ठोणार आहे अशी माहिती रोटरी क्लब मिडटाऊन वेंगुर्लेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड प्रथमेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील रोटरी क्लब ऑफ मिडटाउन वेंगुर्लाच्या कार्यालयात या पदग्रहणं सोहळ्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत क्लबचे नूतन अध्यन अँड. नाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी उपस्थितांत नुतन सचिव मुकुल सातार्डेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप. मावळते अध्यक्ष आनंद बोवलेकर, योगेश नाईक अनमोल गिरप आदी उपस्थित होते.
पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लब मधील पाल्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या पदग्रहण सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित रहाणार आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील विविध संस्था, मंडळे यांचे पदाधिकारी व सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून पदग्रहण सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन चेअरमन अँड प्रथमेश नाईक यांनी केले आहे.
वॉच टॉवर चे होणार लवकरच लोकार्पण
सागरेश्वर समुद्रकिनारी रोटरी क्लब तर्फे वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. समुद्रात बुडणाऱ्यांना लवकर वाचविण्यासाठी या टॉवरचा उपयोग होणार आहे. या टॉवरचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचे यावेळी रोटरी तर्फे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले. तसेच डिस्ट्रिक्ट लेव्हलचे स्पोर्ट्स वेंगुर्ले येथे घेण्यासाठी वेंगुर्ले रोटरीला यजमानपद मिळाले आहे. त्या स्पर्धाही आम्ही यशस्वी करू असे गिरप यांनी सांगितले.
दरम्यान मागील कार्यकारणीने तळागळातील लोकांसाठी चांगले काम केले आहे. तसेच चांगले काम करण्याचा आमच्या नवीन कार्यकारणीचा प्रयत्न राहील असे यावेळी नूतन अध्यक्ष ॲड. नाईक यांनी सांगितले.













