हिंदू युवतींमध्ये जनजागृती साठी लव्ह जिहाद वर लिहिलेले “जिहाद का आणि किती?’या पुस्तकाचे शिरोडा येथे घरोघरी वितरण..

मनिष दळवी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजप शिरोडा महिला मोर्चा कडून उपक्रम..

वेंगुर्ले : दाजी नाईक
भारतात सुरु असलेला लव्ह जिहाद, कार्पोरेट जिहाद, यामुळे हिंदू धर्मातील युवतीवर होणारे अत्याचार या बाबत जनजागृती होण्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी शिरोडा महिला मोर्चा कडून सांस्कृतिक वार्तापत्र यांनी प्रकाशित केलेले “जिहाद का आणि किती?” या पुस्तकाचे हिंदू युवतीच्या घरोघरी जाऊन मोफत वितरण करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

भाजप शिरोडा महिला मोर्चा च्या सदस्य तथा शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सौ. हेतल गावडे, भाजप शिरोडा महिला मोर्चा पदाधिकारी अनुक्रमे सौ.गंधाली करमळकर, सौ. स्नेहा गोडकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य अनुक्रमे रेखा नाईक, अर्चना नाईक यांनी घरोघरी जाऊन हिंदू युवतीना पुस्तकाचे मोफत वितरण केले.

या वितरण कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर, शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे, वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा सदस्य सोमाकांत सावंत, शिरोडा बूथ क्र.८५ अध्यक्ष चंद्रशेखर गोडकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सुधीर नार्वेकर, शिरोडा भाजप पदाधिकारी नितिन तारी, शिरोडा भाजप युवा नेता संतोष धानजी त्याच प्रमाणे केरवाडा ग्रामस्थ किरण मसुरकर आदी यावेळी उपस्थित होते.