चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील साखर माध्यमिक विद्यालयाची “वर्षा सहल “निसर्ग सानिध्यात वसलेले सातनाला धबधबा पोसरे येथे संपन्न झाली.”विद्यालय ते सातनाला धबधबा पोसरे” असा पायी प्रवास, विविध प्रकारची गीते गात करत असताना निसर्ग सानिध्यात असलेली विविध भूरुपे, पर्वत, पठारे, नदीखोरे, धबधबा व परिसरात झालेले भूसख्खलन याबद्दलची माहिती मुख्याध्यापक शरदचंद्र जाधव, प्रभाकर राजमाने, रवींद्र गावकर यांनी विद्यार्थ्यांना दिली.
वर्षा सहलीत निसर्ग सानिध्यात असलेल्या धबधब्यात तसेच आपला भोवतालचा परिसर व त्यातील निसर्ग अनुभवण्याचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी निसर्गाचा आनंद घेत,निसर्गाचे आपल्या जीवनातील महत्त्व समजून घेऊन आपली भूमिका आणि जबाबदारी जाणून घेतली. शेवटी शिपाई अर्चना सुतार व पोषण आहार स्वयंपाकी आश्विनी उतेकर यांनी बनविलेल्या “पाव भाजीचा” आस्वाद निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन वर्षा सहलीची सांगता करण्यात आली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी, विद्यार्थी-शिक्षक, कर्मचारीवर्ग यांनी विशेष मेहनत घेतली. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांनी उपक्रमास आर्थिक सहकार्य केले.












