महसूल मंत्री बावनकुळे यांनी केले संदीप साटम यांचे अभिनंदन; मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजना विधानसभा सह-अध्यक्षपदी निवडीबद्दल शुभेच्छा

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते संदीप साटम यांचा सत्कार; मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजना विधानसभा सह-अध्यक्षपदी निवडीबद्दल शुभेच्छा

कणकवली, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली दौऱ्यादरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजनेच्या विधानसभा सह-अध्यक्षपदी संदीप साटम यांची झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना संदीप साटम यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजनेअंतर्गत शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.