अशोक दाभोलकर यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान!

मसुरे | झुंजार पेडणेकर

श्री विश्वकर्मा मय पांचाळ समाज कालिका देवस्थान, सोलापूरच्या वतीने सुंदर मल्टीपर्पज हॉल, सोलापूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरवसोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या समाजबांधव कौतुक सोहळ्यात वेगुर्ले तालुक्यातील दाभोळी गावचे सुपुत्र अशोक दाभोलकर यांना क्रीडा, शिक्षण, समाजसेवा व संघटनात्मक कार्य, प्रबोधन तसेच शुटिंगबॉल खेळाचा विकास, ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी व महिलांच्या उन्नतीसाठी गेली अनेक दशके राबवित असलेल्या सेवेबद्दल राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले. विश्वकर्मिय समाजाचे श्री. श्री. श्री. प्रणव निरंजन महास्वामी (मुरजावदेश्वर संस्थान मठ, अफजलपूर) ह्यांचे शुभहस्ते मानपत्र, शालश्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपा आमदार श्री. सुभाष (बापू) देशमुख, सर्वश्री एम. एन. शर्मा (उपाध्यक्ष -अभाविम), दिनेशभाई शर्मा (महासचिव – अभाविम), सुश्री विणा चारी (प्रभारी अध्यक्षा -अभाविम), विजय पांचाळ (सेवानिवृत्त अपर पोलीस अधिक्षक), ऍडव्होकेट संतोष महामुनी (हायकोर्ट मुंबई), डॉ. धनंजय सुभाष काताळकर (शा.ग्रा.रुग्णालय.दापोली), धनंजय अ. सुतार (मुख्याध्यापक- कुमारेश्वर विद्यालय, शावळ), सौ. इंदू गुरुनाथ सुतार (जेष्ठ साहित्यिका व लेखिका बिदर), श्री. चंद्रकांत ना. कांडेकरी (जिल्हाध्यक्ष – कोल्हापूर जि.वि.पां.सुतार समाज) उपस्थित होते.