मसुरे | झुंजार पेडणेकर :कोंकण कॅन्सर अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वडाचापाट ग्रामपंचायत आणि उद्योजक श्री. दयानंद प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर डॉ. आदेश पालयेकर (M.S., M.Ch.-Surg. Oncology, Consultant Surgical Oncologist) आणि डॉ. गायत्री पालयेकर (M.B.B.S., DGO, DNB, FRM, Laparoscopic Surgeon, IVF Specialist) रुग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी व निदान, तसेच सर्व प्रकारच्या गाठींची तपासणी.
स्त्रियांच्या सर्व आजारांची तपासणी, गर्भाशय व गर्भाशयातील गाठी, प्रजनक्षमता वाढवणे, प्रसूतीपूर्व तपासण्या आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन. सर्व प्रकारचे हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स, पोटाच्या आतड्यांच्या तपासण्या, मुत्रविकार व किडनी तपासणी, प्रोलॅप्स सर्जरी निदान, किमोथेरपी व जनरल तपासणी.अतिजोखमीच्या व लहान-मोठ्या शस्त्रक्रियांबद्दल मोफत माहिती व मार्गदर्शन.
शिबिराच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राथमिक तपासण्या व शस्त्रक्रियांसंदर्भात आवश्यक माहिती दिली जाईल.
शिबिराच्या ठिकाणी कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही, याची नोंद घ्यावी.
या मोफत आरोग्य शिबिराचा वडाचापाट आणि आजुबाजूच्या सर्व गावांतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच श्री. सचिन पाताडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.












